नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटातून देश सावरत असतांना आता केंद्रात मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या बैठका पार पडल्या आहेत. त्या आधारे केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलावर चर्चांना सुरुवात झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. शिवसेनेसह अकाली दल हे मित्र पक्ष सरकारमधून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार प्रकाश जावडेकर यांना दिला आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कुणाला स्थान मिळणार याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.