कॉंग्रेसचे भाई जगताप यांची पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

On: June 13, 2021 6:05 PM

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान एका पोलिस कर्मचा-याला धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शनिवारी 12 जून रोजीचा आहे. पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या गोरेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले होते.

पोलिसांचे ऐकुन घेण्याच्या तयारीत भाई जगताप नसल्याचे या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसत आहे. समजावण्यासाठी आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी अरेरावी केल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. तसेच एका कर्मचा-याला जोरात धक्का मारल्याचे देखील दिसत आहे. भाई जगताप यांच्या हातात माईक दिसून येत आहे. ते आंदोलकांना सुचना देत पोलिसांचे ऐकत नसल्याचे दिसत आहे. पोलिस जर आंदोलन बंद करण्यास सांगत असतील तर हे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरु ठेवण्यास ते आंदोलकांना सांगत घोषणाबाजी करतात. प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच ते आपल्या कार्यकर्त्यांना मागे सरकण्यास सांगतात. भाई जगताप यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते मागे सरकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment