जळगाव : सहायक सरकारी अभियोक्ता सौ राखी उर्फ विद्या पाटील यांची हत्या जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी सन 2019 मधे झाली होती. त्यांचा पती भरत पाटील याने त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गु.र.न. 20/19 भा.द.वि. 302, 201 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव सत्र न्यायालयाने या खटल्याचा निकाल 13 मे 2021 रोजी दिला आहे. सौ राखी उर्फ विद्या भरत पाटील खून खटल्याचा निकाल राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने संशोधनासाठी घेतला आहे.
सदर गुन्ह्यांचा तपास व निकाल यावर एल.एल.एम च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी (पी.एच.डी.) ठेवला आहे. सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे चाळीसगांव, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे – पाचोरा उपविभाग, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे – जामनेर, पोलीस स्टेशन, केतन जे ढाके – सरकारी अभियोक्ता सेशन कोर्ट जळगांव, डॉ.निलेश देवराज – सहा.प्राध्यापक, डॉ.स्वप्नील कळसकर – सहा प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव, डॉ. हर्षल चांदा – उपजिल्हा रुग्णालय जामनेर, पोहेकॉ रमेश कुमावत – जामनेर पो.स्टे. पोहेका ,नरेद्र वारुळे जळगाव संगणक विभाग, पोलिस नाईक योगेश महाजन – जामनेर पोलीस स्टेशन आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी व शिक्षा लावण्याकामी मोलाची कामगिरी बजावली आहे.