गुन्हेगार मुलगा नेहमीच करायचा थरार !
बापाने केला फायर, झाला कायमचा
गार !!
गार !!
अकोला : “पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा
ऐसा काम करेगा” हे अमिर खान अभिनित गाणे एकेकाळी खुप गाजले होते. आजही ते गाणे आपल्याला
ऐकण्यास मिळते. पिता पुत्राचे प्रेम या गाण्यातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न या गिताच्या
माध्यमातून करण्यात आला आहे. मुलाचे भरीव कार्य, त्याने केलेली प्रगती, त्याने मिळवलेली आणि त्याला मिळालेली प्रसिद्धी
बघण्याचा क्षण वडीलांनी पाहणे भाग्यवान माता पित्यांना मिळत असते.
परंतू आपल्याच मुलाला गोळी घालुन ठार करावे लागण्याचा दुर्दैवी क्षण अकोला शहरात काही
दिवसांपुर्वी घडला. या घटनेने अकोला शहर व जिल्हयात विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही
वर्षापुर्वी अमिताभ बच्च्न अभिनीत शक्ती हा सिनेमा झळकला होता. या सिनेमात बापाची भुमिका
करणारा दिलीप कुमार मुलाच्या भुमिकेतील अमिताभ बच्चन यास गोळी घालून ठार करण्याचे दृश्य
दाखवले आहे. अशाच काहिशा स्वरुपातील घटना अकोला शहरात बघण्यास मिळाली. मुलापासून आपला
जिव वाचवण्यासाठी मुलाला गोळी घालून ठार करण्याचे
काम वडीलांना करावे लागले.

अकोला शहरात काँग्रेस
पक्षाचे वरीष्ठ नेते बाबा भारती यांचा मुलगा मनिष. तो गुन्हेगारी पार्श्वभुमीचा होता.
तरीदेखील बाबा भारती त्याला सांभाळून घेत होते. मनिषवर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले, त्यानेही रोहील नावाच्या मित्राची काही वर्षापुर्वी
हत्या केली होती. मनिषच्या नावावर गंभीर गुन्हयाच्या नोंदी आहेत.
या सर्व प्रकरणात बाबा भारती यांच्या प्रतिष्ठेला कुठे धक्का लागला नाही. त्यांची ओळख, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे सामाजिक
कार्य पाहता समाजात ते एक प्रसिद्ध प्रामाणिक व्यक्तिमत्व असल्याचं समोर येत आहे. या
बाबा भारती यांच्या हातूनच त्यांच्या मुलाची हत्या झाली. बाबा भारती यांनी स्वसंरक्षणार्थ
केलेल्या गोळीबारात पहिली गोळी मनिषच्या छातीत घुसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

बाबा भारती यांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण
केले असून गुन्हयाची प्रांजळ कबुली देऊन टाकली. मनिष भारती गुन्हेगारी जगतात नावाजलेले
एक नाव. अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात मनिषने एक प्रकारे मोठी दहशत निर्माण केली
होती. त्यांच्यावर असलेले अनेक गंभीर गुन्हे यामुळे परिसरातील सर्वसामान्य लोक त्याच्यापासून
दूर दूर रहात होते. अतिशय चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला मनिष संगत गुणांमुळे वाईट
मार्गाला लागला आणि त्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला.

बाबा सिद्दीकी काँग्रेस पक्षात कार्यरत असतांना
अनेक मोठमोठ्या नेत्यांसोबत त्यांची उठबस होती, तेंव्हापासूनच मनिषची डोकेदुखी त्यांच्यामागे लागली. आतापर्यंत मनिषवर
गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. वर्चस्वाच्या लढाईतून दुर्गा चौकात त्याने रोहीलची
२०१० मध्ये हत्या केली होती. यानंतर रोहील गटाकडून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवण्यात
आला होता. तो मरण पावला म्हणून त्याला उचलून नालीमध्ये फेकून दिले होते. मनिष हा या
जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता.

अकोला वगळता मनिष भारतीची दहशत आजूबाजूच्या इतर जिल्हयातही होती. मनिषने
गेल्या काही वर्षापूर्वी यवतमाळमध्ये दरोडा टाकण्याचा गुन्हा केला होता. त्यावेळी त्याने
काहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मनिषवर सध्या नऊ ते दहा
प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. याआधी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अकोला पोलिसांनी
मनिषकडून देशी कट्टा,
गावठी पिस्तूल, काडतूस,
लोखंडी तलवार अशी धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

अकोल्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभय पाटील यांच्यावर प्राणघातक
हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनिषवर डॉक्टर पाटील यांनीसुद्धा गोळीबार केला होता
हे विशेष. घटनेच्या दोन दिवस आधीच मनिष भारती याला अकोला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन
महिन्यांसाठी तडीपार केले होते. या तडीपारीचा राग त्याने आपल्या वडीलांवर काढण्याचा
प्रयत्न केला. तुमच्यामुळे मला तडीपार व्हावे लागत असल्याचा त्याचा आरोप होता.

दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बाबा भारती जठार पेठ भागातील ब्रम्हांडनायक
अपार्टमेंटमध्ये थांबले होते. यावेळी मनिष भारती हा तिथे पोहोचला. दारू पिऊन आलेल्या
मनिषने दरवाजातूनच शिवीगाळ सुरू केली. मनिष हातात धारदार शस्त्र घेऊन उभा होता. मनिष
दारूच्या नशेत कोणावर हल्ला करतो याची जाणीव असल्यामुळे बाबा भारती वेळीच सतर्क झाले.

त्यांनी घरात असलेली रिव्हॉल्वर जवळ घेतली. फ्लॅटच्या हॉलमध्ये पाऊल ठेवताच
मनिषने जवळचा लोखंडी कत्ता काढला आणि बाबा भारती यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा
प्रयत्न केला. यावेळी बाबा भारती जखमी झाले. त्यांनी स्वसरक्षणार्थ झाडलेली गोळी मनिषच्या
छातीत आरपार घुसल्याने तो जागीच कोसळला. घरातच रक्ताचा पाट वाहू लागला. या सर्व घडामोडीनंतर परिसरात एकच खळबळ माजली. गोळीबाराचा आवाज आल्याने अपार्टमेंटमधील सर्व नागरिक घाबरलेल्या अवस्थेत
खाली आले. मनिष भारती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मनिषचा भाऊ राजेश भारती यांनी पोलिसांना दिली.

उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्यासह बरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा
घटनास्थळी दाखल झाला. बाबा भारती यांनी केलेल्या गोळीबारात मनिष भारतीचा मृत्यू झाल्याची
वार्ता शहरभर पसरताच एकच सन्नाटा पसरला. सिव्हील लाईन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा
करून मनिषचा मृतदेह ताब्यात घेतला व विच्छेदनासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात
आला. सिव्हील लाईन पोलिसांनी बाबा भारती यांना घरातून ताब्यात घेतले.

आत्मसंरक्षणासाठी मला गोळीबार करावा लागला अन्यथा माझा जीव गेला असता
अशी कबुली बाबा भारती यांनी पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम
३०२ नुसार गुन्हा दाखल करून बाबा भारती यांना अटक केली.

घटनेच्या पंचवीस दिवस आधी भारती कुटुंबीयांमध्ये संपत्तीची हिस्से वाटणी
झाली होती. दुय्यम निबंधक कार्यालयात याबाबत वाटणी झाल्याची नोंद आहे. बाबा भारती ७६
वर्षाचे असून त्यांना चार मुले आहेत. यापैकी राजेश भारती हे सुद्धा जिल्हा काँग्रेस
कमिटीचे महासचिव आहेत. दोन बहीणीसुद्धा आहेत. दोन बहीणींना प्रत्येकी एक फ्लॅट, एक दुकान देण्यात आले. चारही मुलांना एक-एक
फ्लॅट देण्यात आला असल्याचा दावा भारती कुटुंबीयांनी केला. बाबा भारती यांचा सराईत
गुन्हेगार मुलगा मनिष यांच्यात अनेक दिवसांपासून हिस्से वाटणीवरून वाद सुरू होता. या
वादाने रक्तरंजित वळण घेतले. मनिष घरात आला तेव्हा मनिषकडे धारदार शस्त्र होते. शस्त्र
पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली रिव्हॉल्वर काढली, मुलगा अंगावर येत असल्याचे दिसताच त्यांनी त्या बंदुकीतून झाडलेली गोळी
मनिषच्या छातीत आरपार घुसली, त्यामुळे तो जागीच मरण पावला.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आशिष हॉटेल नावाची बाबा भारती यांची एक इमारत
आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही हॉटेल बंद आहे. या हॉटेलमध्येच तत्कालीन शिवसेना जिल्हा
प्रमुख रणजित चुंगळे यांनी अकोल्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक लक्ष्मीनारायण यांच्यावर
गोळी झाडली होती, तेव्हापासून आशिष बार चर्चेत आला होता.या प्रकरणात रणजित चुंगले यांना आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा देखील झाली. शिक्षा भोगत असतांना रणजित चुंगळे यांचा कारागृहात मृत्यू झाल. मनिषची श्रावगी प्लॉट, रतनलाल प्लॉट, दुर्गा चौकात दहशत होती. या तीन परिसरात उच्चभ्रू लोकांची निवासस्थाने
आहेत. श्रावगी प्लॉट परिसर मनिष बारती याने धंद्याचा केंद्रबिंदू बनवून ठेवला
होता. नुकत्याच झालेल्या तडीपारीच्या कारवाईमुळे मनिष संतापलेला होता. मनिषच्या दहशतीचा अंत अखेर बाबा भारती यांच्या हातूनच झाला.

पोलिसांनी बाबा भारती यांची रिव्हाल्व्हर जप्त केली. जिल्हा पोलिस अधिक्षक अमोघ गावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बाबा भारती यांनी स्वसरक्षणार्थ उचललेले
पाऊल हे योग्यच असल्याचे म्हटले जात आहे. बाबा भारती आणि राजेश भारती यांनी मनिष
यास अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष हा दारुच्या आहारी गेल्याने
आणि त्याची गुन्हेगारांसमवेत उठबैस असल्यामुळे तो घरातील वडीलधा-या माणसांचा मान ठेवत
नव्हता. बाबा भारती कोट्यावधी संपत्तीचे मालक असून
समाजात त्यांची एक चांगली प्रतिष्ठा आहे. उमेदीच्या काळापासून त्यांनी कॉग्रेसमधे
आपले कार्य केले असून कॉग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून आज त्यांची ओळख आहे. मनिषच्या हत्येमुळे भारती यांचेनाव पुन्हा
चर्चेत आले. आय.पी.एस. अधिकारी लक्ष्मीनारायण यांच्यावर गोळीबार
झाल्यानंतर आशिष हॉटेलचे मालक म्हणून बाबा भारती यांचे नाव चर्चेत आले होते.