सिने अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

On: June 25, 2021 3:36 PM

पायल रोहतगी या बॉलिवूड अभिनेत्रीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सतत वादात राहणा-या पायलने ती रहात असलेल्या सोसायटीच्या चेअरमनला समाज माध्यमांवर शिवीगाळ केली होती. यासह सोसायटीत राहणा-या लोकांसोबत नेहमी वाद घालणे, चेररमनला जिवे ठार करण्याची धमकी देणे या विविध कारणामुळे आलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

20 जून रोजी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ती अनाधिकारे सामिल झाली होती. तिला सोसायटीच्या सभेत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावेळी तिने सदस्यांना शिवीगाळ केली होती. मध्ये सदस्य नसतानाही सहभागी झाली होती. सोसायटीच्या सदस्यांनी तिला सभेमध्ये सहभागी होण्यास मनाई केल्यानंतर तिने शिविगाळ केली. मुलांच्या खेळण्याच्या विषयावरुन पायलने रहिवाशांसमवेत वाद घातल्यामुळे तिला सेटेलाईट पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. यापुर्वी देखील पायलला राजस्थान पोलिसांनी एका वादग्रस्त व्यक्तव्याचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे अटक केली होती. राजस्थान न्यायालयाने तिला त्यावेळी जामीन दिला होता.

साधारण फिल्मी कारकिर्द असलेल्या पायलला चर्चेत राहण्यासाठी वाद घालण्यासह वादग्रस्त वक्तव्य करण्याची जुनी सवय असल्याचे म्हटले जाते. तिने रिफ्यूजी, तुमसे मिलकर, रक्त, तौबा तौबा, 36 चाइना टाउन, ढोल, अगली और पगली, दिल कबड्डी यासारख्या सिनेमात रोल केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment