घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरटे मुद्देमालासह अटक

On: February 3, 2026 3:45 PM

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे आंतरराज्य चोरटे त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.  सुखदेव रामसिंग टाक व आकाश दिनेश वाघे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील अयोध्या नगर भागातील बंद घरात घरफोडी झाली होती. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.नं. 79/2026 भा.न्या.सं. 2023 चे कलम 305 (अ), 331 (3) (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील दोघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे फौजदार राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोकॉ विशाल कोळी आदींच्या पथकाला घरफोडीच्या या गुन्ह्याच्या तपासकामी योग्य त्या सुचना देऊन पुढील कारवाईकामी कार्यरत केले होते. गुन्ह्यात चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पथकाने हस्तगत केला आहे. तसेच गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेले सुमारे चार लाख किमतीचे चारचाकी वाहन व वाहनात मिळुन आलेले लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू ड्रॉयव्हर, एक लहान चाकु असा मुद्देमाल देखील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. किरण चौधरी व पो.कॉ. योगेश घुगे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment