स्वबळाचा नारा, त्याला श्रेष्ठींचा आहे का थारा? — निवडणूकीच्या वेळी वाहणार कुठे हा वारा !!

नवी दिल्ली : काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आल्यानंतर स्वबळाचा नारा दिला आहे. हा दौरा अर्धवट सोडून त्यांना श्रेष्ठींच्या आदेशाने तातडीने दिल्लीला जावे लागले. महाराष्ट्रातील पुर्वनियोजित दौरा अर्ध्यात टाकून त्यांनी दिल्लीत धाव घेतली आहे.

एकीकडे स्वबळाची घोषणा करणा-या नाना पटोलेंना मधेच दिल्ली येथे बोलावल्यामुळे आता या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आता वेगळेच विधान केले आहे. एच. के. पाटील यांनी म्हटले आहे की “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी स्वबळावर तयारी सुरु केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेतला जाणार आहे. नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीच्या निमीत्ताने दिल्ली येथे आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार सुरक्षीत आहे, धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत असून कॉंग्रेसचे त्याला समर्थन कायम राहणार आहे. तसेच हे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचे देखील एच. के.पाटील यांनी म्हटले आहे. हिडन ऑपरेशन लोटसबाबत आपल्याला माहिती नाही. आमचे तिन पक्षांचे सरकार असल्यामुळे हिडन लोटस ऑपरेशन महाराष्ट्रात चालणार नसल्याचे देखील एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूका लढवण्याच्या वक्तव्यावर एच. के. पाटील यांनी फारसा उत्साह दाखवला नसल्याचे दिसून येत आहे. या घडीला कोणत्याही निवडणूका नाहीत. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका येतील तेव्हाच्या तेव्हा काय ते पहाता येईल व श्रेष्ठी निर्णय घेतील असे पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here