मुंबई : चार वेगवेगळ्या ठिकाणी आज ईडीने छापे टाकले आहेत. त्यामधे रा. कॉ. नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडील छाप्याचा देखील समावेश आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी ईडीने ही छापेमारी केली आहे.
मुंबईतील दहा बार मालकांनी अनिल देशमुख यांना सलग तिन महिने चार कोटीची रक्कम दिल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. याच पार्श्वभुमीवर ईडीने ही छापेमारी केल्याचे म्हटले जात आहे. या दहा बार मालकांचे जबाव ईडीने नोंदवले आहेत. पोलिस अधिका-यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट दिल्याच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे.