ओबीसी आरक्षणासाठी पाचोरा येथे कॉँग्रेसचे भाजपविरोधी आंदोलन

पाचोरा : देशाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाचोरा काँग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.

देशातील लोकांना आरक्षणाची गरज असुन सर्व प्रथम आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधत कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा मोदी सरकार ओबीसी आणि मराठा बांधवांची फसवणूक करुन देशात हुकुमशाही आणू बघणार्‍या सरकार विरोधात कॉँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आले. निदर्शन करण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कॉँग्रेसच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी नही चलेगी, नही चाहीए सोना चांदी हमे चाहीए राहुल गांधी, ओबीसी सह मराठा समाजाला फसवणा-या भाजपा सरकारचा निषेध असो …… अशा विविध घोषणांचा यावेळी समावेश होता. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, किशोर गरुड, गणेश गायकवाड, महीला तालुका अध्यक्षा अ‍ॅड. मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सरचिटणीस कुसुम पाटील, क्रांती पाटील, रेखा पाटील युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,शिवराम पाटील, इस्माईल तांबोळी, संजय सोनार, दिपक सोनवणे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here