कानपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कानपूर दौ-यानिमीत्त सीआरपीएफ जवानांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. या दौ-यामुळे एका घटनेत चिमुकलीचा तर दुस-या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर उठल्याची तिव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
25 जूनच्या सकाळी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यातील एका वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील तिन वर्षाची चिमुकली खाली पडून वाहनाच्या चाकाखाली आली. त्यात तिचा मृत्यु झाला. दुस-या घटनेत याच दिवशी सायंकाळी राष्ट्रपतींच्या वाहनाच्या ताफ्यासाठी गोविंदनगर रेल्वे क्रॉसींगजवळ रहदारी जवळपास दिड तास रोखण्यात आली होती. त्यामुळे रहदारीत अडकलेली एक रुग्ण महिला वेळेच्या आत दवाखान्यात पोहोचू शकली नाही. त्यात तिचा देखील मृत्यू झाला.