नाशिक : हिंदी व तामिळ चित्रपटासह रिअॅलिटी शो मधे काम केलेल्या अभिनेत्रींसह कोरिओग्राफरला रेव्ह पार्टी दरम्यान इगतपुरी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या इगतपुरी येथील एका बंगल्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या अभिनेत्री व कोरिओग्राफर असे सर्वजण पोलिसांच्या गळाला लागले आहेत. तसेच या धाडीदरम्यान बंगल्यातून दहा पुरुष व बारा महिला देखील ड्रग्ज, कोकेन व गांजा सेवन करतांना आढळून आले आहेत.
पर्यटकांना भुलवणारा इगतपुरीचा हा परिसर बॉलीवुड तारकांना आकर्षित करत असतो. इगतपुरी येथील एका खासगी बंगल्यात बॉलीवुड मधील महिला कलाकार व काही पुरुष अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना समजली होती.
शनिवारी व रविवारच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या खासगी बंगल्यावर छापा घातला असता रेव्ह पार्टीचा धिंगाना सुरु असल्याचे आढळून आले. अभिनेत्रींसह सर्वांना इगतपुरी पोलिस स्टेशनला आणले गेले. विविध कलमानुसार त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलांमधे एका विदेशी महिलेचा देखील समावेश आहे. ती महिला इरानची असल्याचे सांगण्यात आले आहे.