नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक – एकाला अटक

जळगाव : फ्रिडम ग्लोबल रिसर्च कन्सल्टन्सी या नावे असलेल्या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमधे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणा-या तिघा भामट्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. संदिप विवेककुमार भारद्वाज (32) रा. 203, सिंघेश्वर अपार्टमेंट सिंगापूर टाऊनशिप इंदोर (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

फ्रिडम ग्लोबल रिसर्च कन्सलटन्सी या नावे सुरु केलेल्या फर्मच्या माध्यमातून संदिप विवेककुमार भारद्वाज, मल्होत्रा व दिलीप मिश्रा (पुर्ण नाव नाही) या तिघांनी शाम आत्माराम सटाले रा. अयोध्यानगर जळगाव यांचेशी संपर्क साधला. तिघांनी मिळून शाम सटाले यांना शेअर मार्केटमधे चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन सटाले यांना दिले. वेळोवेळी संपर्क साधून तिघा भामट्यांनी सटाले यांना संदिप भारद्वाज याच्या अ‍ॅक्सीस बॅंकेच्या खात्यात 2 लाख 35 हजार 577 रुपये जमा करण्यास सांगितले होते. हा प्रकार डिसेंबर 2019 ते मे 2020 या कालावधीतील आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाम सटाले यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली संदिप भारद्वाज यास 26 जून रोजी  हे.कॉ. गफुर तडवी, पो.कॉ. शांताराम पाटील यांनी त्याला इंदोर येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडून संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. अमोल मोरे व रतीलाल पवार करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here