नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रीमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाला असल्याचे म्हटले जात आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून दोघा नावांपैकी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात जाणार असल्याचे मानले जात आहे. त्यांना रेल्वे अथवा उर्जा खात्याचा कारभार दिला जाणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील तिन ते चार जणांना या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातील फडणवीस यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेस सोडून भाजपात आलेले ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्याकामी राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांची महत्वाची भुमिका होती.