राहुल शिंदे यांची निवड

On: July 2, 2021 5:42 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथील कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
सोशल मिडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मान्यतेनुसार तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या सोशल मिडीया अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे. राहुल शिंदे यांच्या नियुक्तीचे पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणीतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. आगामी काळात कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेला घराघरात पोहचवण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर जोरदार काम करण्याचा निर्धार नुतन अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment