जखमी तरुणाच्या मदतीसाठी कॉंग्रेसची मागणी

On: July 3, 2021 9:42 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड भागात रानडुकराच्या हल्ल्यात सालदार जखमी झाला आहे. हिंस्र प्राण्यांपासून शेतक-यांसह गावक-यांच्या बचावासाठी वनविभागाने तातडीची उपाय योजना करण्यासाठी कॉंग्रेसने मागणी केली आहे.

पाचोरा तालुक्यातील मालखेडा जंगलात जवळपास 327 हेक्टरचा परिसर आहे. या जंगल परिसरात हिंस्त्र प्राण्यांपासून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आज शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांच्या शेतातील सालदार जब्बार तडवी यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. या घटनेत सालदार तडवी मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. त्याला पाचोरा येथे दवखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जखमीची भेट घेत माहिती जाणून घेतली. हिंस्त्र श्वापदांपासून बचाव होण्यासाठी वनविभागासह शासनाने लक्ष देण्याची मागणी सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment