नवी दिल्ली : 7 जुलै रोजी मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणविस, नारायण राणे व हिना गावित यांना स्थान मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात जवळपास 25 ते 28 जणांची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु होते. बैठकीदरम्यान संबंधितांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जात होता. उत्तर प्रदेशमधून तीन ते चार मंत्र्यांचा या विस्तारात सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळात 53 मंत्री आहेत. यात अजून विस ते पंचवीस जणांचा सहभाग वाढणार आहे. या विस्तारात अनेक नव्या चेह-यांचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे.