कोल्हापूर : केवळ मद्य पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरुन संतप्त झालेल्या मुलाने त्याच्या आईची हत्या करुन काळीज काढणा-या तरुणाला कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली अहे. सुनिल कुचकोरवी असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
28 ऑगस्ट 2017 रोजी सदर दुर्दैवी घटना घडली होती. यल्लवा रामा कुचकोरवी असे हत्या झालेल्या मातेचे नाव आहे. या खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. फुगे, कंगवे विकून मयत यल्लवा ही महिला उदरनिर्वाह करत होती. तिचा मुलगा सुनिल यास दारु पिण्याचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. व्यसनाधिन झालेल्या सुनिल दारुसाठी कसलेही भान रहात नव्हते. दारु पिण्यासाठी आईकडून पैसे मिळत नसल्यामुळे त्याने वाद घातला होता. त्या वादातून त्याने आई यल्लवा हिच्यावर चाकूचे वार केले होते. तिच्या मृतदेहाचे त्याने निर्दयीपणे तुकडे देखील केले होते.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सुनिल यास ताब्यात घेत अटक केली होती. परिस्थीतीजन्य पुराव्याच्या आधारे सुनिल यास दोषी धरत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. विवेक शुक्ल यांनी कामकाज पाहिले. स.पो.नि. एम. एम. नाईक यांनी त्यांना सहकार्य केले. चार वर्षाच्या बालिकेमुळे हा प्रकार उघड झाला होता. त्या बालिकेने घरातून वाहून येणारे रक्त पाहिले होते. तिने या घटनेची माहिती तिच्या घरात दिल्याने या घटनेची वाच्यता झाली. मृतदेहाच्या काळजाचा तुकडा एका भांड्यात त्याने ठेवलेला होता. तसेच मृतदेहाचे तुकडे जागेवर पडलेले होते. सुनिल हा देखील मद्याच्या नशेत पडून होता.