मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात काही फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. कामगिरीचा आधार घेत काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. एका राज्यमंत्र्यास कॅबिनेटचा दर्जा दिला जाणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. तसेच दोघा मंत्र्यांना डच्चू मिळण्याचे भाकित वर्तवले जात आहे. या दोघा मंत्र्यांपैकी एक मंत्री आदिवासी भागातील तर दुसरा मुंबई येथील असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील सत्तेत असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि रा.कॉ. मधे काही मंत्री आणि कार्यकर्ते नाराज असल्याच्या बातम्या येत असतात. सेनेच्या आमदारांच्या देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत. केंद्रातील बदलाप्रमाणे आता राज्य मंत्रीमंडळात देखील बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस नेतृत्वाला नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदी राहून पुर्ण वेळ काम बघावे अशी कॉंग्रेस नेतृत्वाची अपेक्षा असल्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची शक्यता कमी असल्याचे देखील म्हटले जात आहे.