अदानींच्या नावाचा फलक तोडला शिवसैनिकांनी

On: August 2, 2021 4:17 PM

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील अदानी यांच्या नावाच्या फलकाची शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा नावाचे फलक विमानतळ परिसरात लावले होते. या प्रकारामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या फलकाची मोडतोड केली. अदानी समुहाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.

व्हीआयपी गेट क्रमांक 8 आणि विलेपार्ले महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर असलेला फलक शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्यांनी तोडला. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अदानी विमानतळ असे फलक लावल्यास ते अजिबात सहन केले जाणार नाही असा शिवसैनिकांचा सुर आहे.

जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा फलक लावण्याची सुचना शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल त्याठिकाणी तोडफोड करण्याचा शिवसेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment