भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बिड पोलिसात गुन्हा

On: August 3, 2021 5:57 PM

मुंबई : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा.कॉ.चे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या तक्रारीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताला स्वत: चित्रा वाघ यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. महिलांवर होणा-या अत्याचाराच्या विरुद्ध बोलल्याने जर आपल्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर असे शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील असे त्यांनी म्हटले आहे.

रा.कॉ.चे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका तरुणीकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मेहबूब शेख अडचणीत आल्याने त्यांची पोलिस चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी वेळोवेळी आवाज उठवला.

18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार (जि.प. सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह असंख्य कार्यकर्ते देखील आले होते. आपली बदनामी होण्याच्या उद्देशाने आपण एका मुलीवर बलात्कार केल्याचे व आपणास बलात्कारी म्हटल्याचा आरोप मेहबुब शेख यांनी केला आहे. राज्य सरकार मेहबुब यास अटक करत नसल्याचे चित्रा वाघ यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपांची चौकशी व तपास पुर्ण होऊन गुन्हा निकाली काढण्यात आला असल्याचे मेहमुद शेख यांचे म्हणणे आहे. आपली बदनामी होण्याच्या उद्देशाने चित्रा वाघ यांनी आपल्यावर आरोप केल्याचे मेहबुब शेख यांचे तक्रारीत म्हणणे आहे. या आरोपामुळे आपली समाजात बदनामी झाली असल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment