पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान यांचा इस्लामाबाद येथील सरकारी बंगला भाड्याने देण्याचा तो निर्णय आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गेल्या सन 2019 पासून त्यांच्या सरकारी बंगल्याचा वापर करत नाहीत. ते त्यांच्या खासगी ‘बानी गाला आवास’ येथे राहतात. सन 2019 मधे २०१९ इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थानाचे विश्वविद्यालयात रुपांतर केले जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र तसे झाले नाही.
पंतप्रधान सरकारी निवासस्थान शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो अथवा अन्य कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाणार आहे. पूर्ण इमारतीऐवजी कुणाला केवळ लॉन, गेस्टरुम देखील मागणीनुसार भाड्याने दिली जाणार आहे. या निवासस्थानाच्या शिस्त व मर्यादेचे उल्लंघन होत नसल्याचे पाहण्याची जबाबदारी नियुक्त समितीवर राहणार असल्याचे समजते.