माजी महापौर ललित कोल्हेंचा जामीन फेटाळला

On: July 14, 2020 5:30 PM

जळगाव : बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेतील माजी महापौर ललित विजय कोल्हे (४५) कोल्हे नगर यांचा जामीन न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. १६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता.

या घटनेतील फरार ललित कोल्हे यांना पाच महिन्यांनी २७ मे रोजी पोलिसांनी महाबळ परिसरातून अटक केली होती. ललित कोल्हे सध्या गोदावरी महाविद्यालय व रुग्णालयात दाखल आहेत. न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीन मिळण्याचा अर्ज केला होता.

न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारतर्फे अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment