मुंबई : कोरोनाची लाट आवाक्यात आल्यामुळे बाजारपेठा व लोकल सेवा सुरु करण्याची राज्य सरकारने संमती दिली आहे. त्या सोबतच आता मॉल्स व हॉटेल्स सुरु करण्यासाठी देखील संमती दिली आहे.
15 ऑगस्ट पासून मॉल्स आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत उघडण्यास राज्याने परवानगी दिली असली तरी लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले असतील त्यांनाच प्रवेशाची अट ठेवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई व पुण्यानंतर राज्यात देखील हॉटेल्स व मॉल्स दहापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी व्यावसायिकांकडून जोर धरत होती. आता राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची वेळ रात्री 10 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सिनेमा थिएटर, नाट्यगृह आणि मंदिरे मात्र बंद राहणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.