मलायका देणार गुड न्युज

On: August 12, 2021 4:55 PM

छय्या छय्या गाण्यावर थिरकणारी हॉट ग्लॅमरस बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिस वयाच्या 47 व्या वर्षी नव्याने आई होण्याची इच्छा झाली आहे. मलायका नेहमी कोणत्यातरी कारणाने चर्चेत रहात असते. मलायकाला मुली आवडत असल्यामुळे ती मुलगी दत्तक घेण्याच्या विचारात आहे. याबाबतीत ती लवकरच गुड न्युज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरबाज खान पासून विभक्त झालेली मलायका एका मुलाची आई आहे. दत्तक मुलगी घेतल्याने तिची एका मुलीची आई होण्याची इच्छा पुर्ण होणार आहे.
अर्जुन कपुरसोबत सध्या तिची रिलेशनशिप सुरु आहे. एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की तिला मुली आवडतात मात्र तिला पहिला मुलगा झाला. मुलगी दत्तक घेण्याचे तिचे नियोजन सुरु असल्याचे म्हटले जात आहे. मलायकाच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे तिचा मुलगा अस्वस्थ झाला होता. मात्र काळाच्या ओघात त्याने स्वत:ला सावरले असून मलायकाच्या निर्णयावर तो समाधानी आहे. मलायका सध्या अर्जुन कपूर सोबत डेट करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment