मुंबई आग्रा महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद
नाशिक ग्रामीण स्थानक गुन्हे शाखेची कारवाई
नाशिक : –
महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या नवीन पिकअप वाहनांची इतर राज्यांसह देशातील सिमावर्ती देशांमध्ये
डिलीव्हरी देण्याकामी मुंबई येथील नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक मुंबई आग्रा महामार्गाने नेहमी वाहतुक करत असतात.
दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक कृष्ण कुमार सिंग चंद्रसेठसिंग, रा.सुलतानपुर, उत्तरप्रदेश हे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप डिलीव्हरी देणेसाठी मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक बाजुकडुन मालेगाव-धुळे मार्गे घेवुन जात असतांना, पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील टेहरे गाव शिवारात अज्ञात ०४ आरोपींनी त्यांच्या पिकअप गाडीला सिल्व्हर रंगाची मारूती व्हॅन आडवी लावून त्यांचे डोक्याला छ-याची बंदुक लावुन मारहाण करून त्यांच्या कब्जातील नवीन महिंद्रा पिकअप गाडी, मोबाईल फोन व रोख रूपये असा एकुण ५ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेला होता.
सदर बाबत मालेगाव छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर १०/२०२० भादवि कलम ३९४, ३४
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी जिल्हयातील मालाविरूध्दचे नाउघड गुन्हयांचा सविस्तर आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना
दिल्या आहे. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या पथकाने वरील
गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. तसेच सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व घटनास्थळाची पाहणी केली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवली असता गुप्त माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे १) गोरख अशोक गांगुर्डे, रा.सोमवार हट्टी, चांदवड, ता.चांदवड यास चांदवड शहरात रात्रभर सापळा लावुन ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे साथीदार नामे २) सुनिल गोविंद डगळे. रा. खेडगाव, ता.दिंडोरी, ३) रोहित जयराम गांगुर्डे, रा.औताळे, ता.दिंडोरी, व ४) निरंजन तुळशीराम मंगळे, रा. ओझर टाउनशिप, ता.निफाड यांचेसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपीतांना खेडगाव, ता.दिंडोरी व ओझर परिसरातुन ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना सदर गुन्हयाच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेकडून अधिक विचारपुस केली असता, आरोपी गोरख गांगुर्डे व सुनिल डगळे हे दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतक-यांचा माल मार्केटला
विक्री करण्यासाठी पिकअपवर ड्रायव्हर म्हणुन काम करत होते. त्यांनी दोघांनी मिळुन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची परराज्यात डिलीव्हरी साठी घेवून जाणारी एक नवीन पिकअप वाहन चोरण्याची योजना बनविली.
त्याप्रमाणे दि. १८ जानेवारी रोजी वरील सर्व आरोपींनी ओझर येथील निरंजन मंगळे याचे मारूती व्हॅनमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील टेहरे गावाच्या शिवारात जावुन तेथे धुळे बाजुकडे जाणारी एक नवीन पिकअप गाडी अडविली. त्यावरील चालकास छ-याचे बंदुकीचा धाक दाखवुन मारहाण करून त्याचेकडील महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप गाडी, मोबाईल फोन व रोख रूपये असा मुददेमाल जबरीने लुटमार केली आहे. तसेच यातील सर्व आरोपींनी चोरी केल्यानंतर ०३ ते ०४ दिवसांनी खेडगाव येथे सदर
पिकअप गाडीचे स्पेअर पार्टस् चेसिस, कॅबिन, ट्रॉली, इंजिन, डिस्कसह टायर असे खोलुन वेगवेगळे केले.
त्यानंतर सदर स्पेअर पार्टस् विक्री करून पैसे आपसात वाटुन घ्यायचे ठरविले. त्याप्रमाणे वरील आरोपींनी
यातील चोरी केलेले पिकअप गाडीची ट्रॉली शिरसगाव, ता.निफाड येथील इसम नामे ५) अनिल विष्णु चौरे
यास विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यावरून इसम नामे अनिल विष्णु चौरे यास ताब्यात घेण्यात आले.
त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता, वरील आरोपींनी चोरून आणलेल्या पिकअप गाडीचे इतर पार्टस विक्री करण्यासाठी आरोपी विष्णु चौरे याने मदत केली आहे. तसेच यातील आरोपी सुनिल डगळे याने चोरी केलेले पिकअप गाडीचे टायर व डिस्क त्याच्या मालकीच्या पिकअप क्र. एम.एच.१५.जी.व्ही.५४३७ या वाहनास
बसविल्याचे समजले असुन सदर आरोपींनी गुन्हा करतांना त्यांचा साथीदार निरंजन मंगळे याची मारूती इको व्हॅन वापरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वरील आरोपींचे कब्जातुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअपचे स्पेअर पार्टस्,
गुन्हयात वापरलेली मारुती इको व्हॅन, तसेच चोरी केलेले पिकअपचे स्पेअर पार्टस् बसविलेल्या ०२ महिंद्रा
पिकअप गाडया असा एकुण १३ लाख ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्हयाच्या पुढील तपासकामी मालेगाव छावणी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, पोउपनि मुकेश गुजर, सपोउनि अरूण पगारे, पोहवा संजय गोसावी, पोना हेमंत गिलबिले, पोकॉ मंगेश गोसावी, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम, संदिप लगड, पोना भुषण रानडे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.