रा.कॉ. पक्षाच्या तळोदा शहराध्यक्षपदी योगेश मराठे

On: August 17, 2021 5:41 PM

तळोदा : तळोदा येथील योगेश शांताराम मराठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्क्षाच्या तळोदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. योगेश मराठे यांची जनसेवेच्या कामात झोकून देण्याची पद्धत लक्षात घेत त्यांची वरिष्ठ पातळीवरुन दखल घेण्यात आली आहे. तळोदा शहराध्यक्षपदी करण्यात आलेल्या त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधे चैतन्य पसरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांची विचारसरणी घेऊन वाटचाल करण्याचे योगेश मराठे यांनी “क्राईम दुनिया”शी बोलतांना आपले विचार व्यक्त केले.

याप्रंसगी युवा नेते अ‍ॅड. राऊ बाबा मोरे, भटक्या विमुक्त जाती प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवार, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीरमिया जहागिरदार, जिल्हा उपाध्यक्ष रामराम आघाडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुसोत्तम चव्हाण,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर, सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, नगरसेवक हितेंद्र क्षेत्रिय, नगरसेवक संदिप परदेशी, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, केशरसिंग क्षेत्रिय, निलेश चौधरी, हेमंत बिरारे, कृषी उ.बा.समितीचे सदस्य भरत चौधरी, कमलेश पाडवी, महेंन्द्र पोटे, मुकेश पाडवी, जयेश जौहरी, ईमरान सिकलीकर, विकास क्षत्रिय, आदिल शेख, संदीप वळवी, गोलु बारी, दिपक पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थित त्यांना पत्र देण्यात आले असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment