मैत्रेयला 4 लाख 98 हजाराचा दंड

धुळे : मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅंण्ड स्ट्रक्चर या प्रकल्पात गुंतवण्यात आलेली रक्कम मिळत नसल्यामुळे तब्बल 98 ठेवीदार ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे दोन याचिका दाखल केल्या होत्या. गेल्या दोन वर्षापासून या याचिकांवर न्यायालयीन कामकाज सुरु होते.

आगामी 45 दिवसात ठेवीदार ग्राहकांना त्यांच्या ठेवीची दरसाल दरशेकडा 12 टक्के व्याजदराने परतीचे आदेश धुळे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने मैत्रेय प्लाटर्स अ‍ॅंण्ड स्ट्रक्चरला दिले आहेत. याशिवाय शारीरिक, मानसिक व तक्रारीच्या खर्चापोटी 4 लाख 90 हजार रुपयांचा दंड देखील सुनावला आहे. या सुनावणीच्या वेळी कंपनीच्या वतीने कुणी प्रतिनिधी हजर नव्हता. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी निकाल दिला आहे. 

धुळे जिल्ह्यातील “मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅंण्ड स्ट्रक्चर प्रा. लि.” या कंपनीत विविध ठेवीदारांनी आपली रक्कम गुंतवली होती. मात्र मुदत पुर्ण झाल्यानंतर देखील ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळत नव्हती. अखेर त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेत आपली कैफीयत मांडली.

भारती मेघनाथ बागुल व इतर आणि उज्ज्वला शंकरराव देवरे व इतर अशा दोन वेगवेगळ्या याचिका मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅंण्ड स्ट्रक्चर्सच्या विरोधात ग्राहक मंचाकडे 2 जुलै 2019 रोजी दाखल करण्यात आल्या होत्या. या सुनावणीच्या वेळी कंपनीच्या वतीने कुणीही हजर नव्हता. ठेवीदार ग्राहकांच्या बाजूने अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. ग्राहक मंचाचे अध्यक्ष, न्या. संजय बोरवाल व संजय जोशी यांनी सदर आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here