पाचोरा (प्रतिनिधी) : आधुनिक भारताचे जनक स्व. राजीव गांधी यांना पाचोरा येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पावसाने देखील हजेरी लावली होती. पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली स्व. राजीव गांधी यांना देण्यात आलेल्या आदरांजलीच्या वेळी त्यांच्या त्यागाची उजळणी करण्यात आली. आज आपल्या देशात सुरु असलेल्या संगणकीय कामकाजाची संकल्पना राजीवजी यांनी आणली आहे. यावेळी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, संदीप पाटील, मुसेब बागवान, जावेद बागवान, फरजान बागवान, अॅड. वसीम बागवान, अनिल मोची, संतोष काटकर, दादु वारळे, शाम ढवळे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.