गोळीबार प्रकरणातील आरोपींचा जामीन नामंजूर

On: August 27, 2021 8:32 AM

जळगाव – जळगाव महानगरपालिकेचे शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांच्यावरील कथित गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. महेंद्र पांडुरंग राजपूत, किरण शरद राजपूत, उमेश पांडुरंग राजपूत व जुगल पाटील यांचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे.

भूषण गौतम बिऱ्हाडे हा संशयित अद्याप बेपत्ता आहे. अटकेतील सर्व सहा जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली असता सुनावणीअंती न्यायालयाने अटकेतील पाच संशयितांचे जामीन व बेपत्ता भुषण बिऱ्हाडे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

न्या. बोरा यांच्या न्यायालयात सदर न्यायालयीन कामकाज पुर्ण झाले. यावेळी संशयीत आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पाटील यांनी कामकाज पाहिले. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संदीप परदेशी सखोल तपास करत आहेत. अटकेतील आरोपीतांच्या जामीनाकडे गुन्हेगारी क्षेत्रातील सदस्यांचे लक्ष लागून होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment