सोमवारी पाचोरा बंदची हाक

On: September 26, 2021 10:15 PM

जळगाव – केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी दिल्ली सिमेवर संपुर्ण भारतातील शेतकरी बांधव सनदशीर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे समर्थन आणि या कायद्याचा निषेध करण्यासाठी एक दिवसाच्या भारत बंदचे आवाहन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे.

भारत बंदच्या आंदोलनात पाचोरा शहर सहभागी झाले आहे. पाचोरा शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी केले आहे. महाविकास आघाडीचे सर्व कायकर्ते व पदाधिका-यांनी 27 सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी दहा वाजता उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment