पाचोरा (प्रतिनिधी) – दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कॉंग्रेस ने भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पाचोरा येथील व्यापारी वर्गाने सकाळच्या सत्रात आपली दुकाने बंद ठेवली होती.
भारत बंदच्या आवाहनाला महाराष्ट्रातून कॉंग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिसाद देत पाचोरा शहरातील व्यापारी बांधवांना बंद मध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, कॉंग्रेस शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक उमेश एरंडे, लिगल सेलचे अध्यक्ष अविनाश सुतार, फकीरा पाटील, नाना पाटील, भुषण पाटील, गोपी पाटील, योगेश कुमावत, मनसे तालुका अध्यक्ष शुभम पाटील, सत्तार, बागवान, आदींनी केले.
शहरातील व्यापारी बांधवांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य केले. यावेळी पो. हे. कॉ. नितीन सुर्यवंशी, पो कॉ. सुनील पाटील आदींसह इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान बंद चे आवाहन करतांना छोटु शिंपी नामक कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक भोवळ आली. पाचोरा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह इरफान मनियार आदींनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अनुपमा भावसार यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार केले. शिंपी यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्यांची तब्बेत चांगली आहे.







