“आय लव्ह यू” म्हणणा-या तरुणास सात दिवस सक्तमजुरी

On: October 5, 2021 8:28 AM

अमरावती : “आय लव्ह यू” असे अल्पवयीन मुलीस तिचा पाठलाग करत म्हणणा-या तरुणाला सात दिवसांची सक्तमजुरी अमरावती सत्र न्यायालयाने सुनावली आहे. प्रमोद खडसे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील तरुणाचे नाव आहे. अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशन हद्दीत 18 ऑगस्ट 2016 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी न्यायालयाने सदर निकाल दिला आहे.

सोळा वर्षाची मुलगी विहिरीवर पाणी भरत असताना आरोपी प्रमोद खडसे त्याठिकाणी आला. त्याने मुलीचा पाठलाग करत तिला “आय लव्ह यू” असे म्हटले होते. या घटनेपुर्वी देखील वेळोवेळी त्याने तिचा पाठलाग केला होता. मात्र पिडीतेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. याप्रकरणी पिडीत मुलीने मंगरुळ दस्तगीर पोलिस स्टेशनला प्रमोद खडसे विरुद्ध रितसर तक्रार दाखल केली होती. मंगरुळ दस्तगिर पोलिसांनी पिडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपासाअंती 29 नोव्हेंबर 2016 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकरपक्षाच्या वतीने एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजुच्या युक्तीवादाअंती आरोपीचा दोष सिद्ध झाला. अतिरिक्त सह सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती एस. जे. कांबळे यांनी प्रमोद खडसे यास सात दिवस सश्रम कारावास व दोनशे रुपयांचा दंड सुनावला आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शशीकिरण पलोड यांनी सरकारच्या वतीने कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment