नवी दिल्ली – राजस्थानातील सत्तासंघर्षाचा पेच अजूनही सुरुच आहे. हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे. याप्रकरणी आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सर्व घडामोडी दरम्यान अजूनही काँग्रेसला आशा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्या संपर्कात आहेत.काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या स्वत: देखील पायलट यांच्यासंपर्कात असल्याचे समजते.
सचिन पायलट यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी दररोज संपर्क ठेवून आहेत. प्रियंका गांधी यांनी सचिनपायलट यांना राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करावी असं सांगितले. मात्र पायलट यांनी तो प्रस्ताव अमान्य केला आहे. पायलट यांच्या या पवित्र्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या अंतर्गत वादावर भाजपाचे लक्ष आहे ते या घडीला वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या संघर्षात भाजपाकुठलीही घाई करणार नाही. राजस्थान भाजपाध्यक्ष सतीशपूनिया यांनी सांगितले आहे की, आम्ही अशोक गहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नाही. सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर आम्ही कुणालाही आमंत्रण देणार नाही.
जर कुणी आमच्यासोबत येणार असेल तर त्यांचे निश्चित स्वागत आहे. पक्षाचे वरिष्ठ राजस्थानच्या सत्तासंघर्षावर लक्ष ठेवून आहेत असे त्यांनी सांगितले.काही नेत्यांचे म्हणणे आहे की, जर पक्षाने योग्य वेळी फायदा घेतलानाही तर ते मुर्खपणाचे ठरेल.
राहुल गांधी यांचीही सचिन पायलटकाँग्रेसमध्ये रहावे अशी इच्छा दिसत आहे. त्यासाठी राहुल गांधी हे पायलट यांच्या घर वापसीसाठी अनुकूल वातावरण करत आहेत. एकंदरीत काँग्रेसही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.