नवी दिल्ली – अयोध्येतील प्रस्तावित प्रभू श्रीराममंदिराचे भूमिपूजन येत्या 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचा निर्णय रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने घेतला आहे. त्याबाबतचे निमंत्रण न्यासाने पंतप्रधानांना पाठवले आहे. नेमके कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचे या बाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे.
कोरोना अथवा लॉकडाऊनचा अडथळा आला नाही तर भूमिपूजनानंतर साडेतीन वर्षांत मंदिराचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंदिर निर्माणाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना सोलापूर दौ-यात टोला लगावला होता.
पवारांच्या या विधानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सहमती दर्शवली आहे. दिग्विजय सिंह यांनी नुकतेच याबाबतचं एक ट्विट केलं आहे. काही लोकांना वाटते की राम मंदिर निर्माण केल्यामुळे कोरोना बरा होईल.
कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे असे पवार यांनी म्हटले होते. आपले खासदार याबद्दल जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधणार आहेत असे पवार यांनी म्हटले होते. आता दिग्विजय सिंग यांनी पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.