पाचोरा बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन

पाचोरा (प्रतिनिधी) – शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांना चिरडून टाकण्याच्या लखीमपूर येथील घटनेत चौघा शेतकर्‍यांनी प्राण गमावले आहेत. हिंसाचारास कारणीभूत ठरलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या 11 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंद मध्ये पाचोरा शहरातील व्यापा-यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजपा सरकार विरोधात देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रियंका गांधी यांना देखील अटक करण्यात आल्याने संतापात अजूनच भर पडली आहे. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात सहभागी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझर खान, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर यांनी आवाहन केले आहे. पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी आठ वाजता महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here