गोंदीया (अनमोल पटले) : पप्पू ठाकूर यांच्या रेल्वे स्टेशन परिसरातील शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रेरणेने पप्पू ठाकुर यांनी सुरु केलेल्या या शिवभोजन केंद्राचा लाभ गोरगरिबांना होणार आहे. उद्घटनाच्या वेळी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, राजू एन जैन, राजेश दवे, किशोर ठाकूर, राजू ठाकूर, पप्पू ठाकूर, विशाल ठाकूर, व नागरिक हजर होते.