गोंदीया (अनमोल पटले) : तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आ. विजयभाऊ रहांगडाले यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने एकोडी आरोग्य उपकेंद्राला रुग्णवाहिका मिळाली असून त्याचा लाभ परिसरातील रुग्णांना होणार आहे. याशिवाय दवनीवाडा व भानपुर प्राथमिक आरोग्य उप केंद्राला देखील रुग्णवाहिका मिळाली आहे.
तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे विधीवत पुजन करण्यात आले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे. एकोडी येथील उपसरपंच श्रीमती वर्षाताई अंबुले, ग्रा.प. सदस्य अजाबराव रिनायत, पुरषोत्तम भदाले, राकेशजी बिसेन, डॉ विवेकजी चाचेरे सर, डॉ फाहिम अख्तर सर दवनीवाडा, शुभम बिसेन सर, ख़ालिक भाई पठान पत्रकार एकोड़ी, संतोष रिनायत सामाजिक कार्यकर्ता एकोड़ी व प्रथामिक आरोग्य केन्द्र एकोड़ी चे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.