जिल्हाधिका-यांचे स्वीय सहाय्यक लाचेच्या सापळ्यात

गोंदीया (अनमोल पटले) : गोंदिया जिल्हाधिका-यांचा स्विय सहायकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अव्वल कारकुन राजेश मेमन यांच्यावर लाचलुचपत विभागाने 13 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईने खळबळ माजली आहे. दहा हजार रुपयांची लाच घेतांना त्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गोंदीया ग्रामीण पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याच्या नुतनीकरणासह हस्तातंरण करण्याकामी रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र या शासकीय कामासाठी मेमन यांनी तक्रारदाराकडे अकरा हजार रुपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्या घेण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने एसीबीकडे धाव घेत कारवाईची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने या कारवाईत मेमन यांना लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here