गोंदीया (अनमोल पटले) : शिधा पत्रिका धारकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश आ. विनोद अग्रवाल यांनी सर्व संबंधीत अधिकारी वर्गाला दिले आहेत. शिधा पत्रिका धारकांच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. धान्य वितरणातील घोळ, जादा दराने रेशनच्य धान्याची विक्री, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अशा स्वरुपाच्या लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या देखील तक्रारी पुढे आल्या होत्या.
या सर्व तक्रारी लक्षात घेत आ. विनोद अग्रवाल यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सवई, तहसीलदार आदेश डफल, नायब तहसीलदार पाटणे, अन्न निरीक्षक भारती वाकुडे, शिंदे यांच्यासह विविध अधिकारी यांना पाचारण करत बैठक बोलावली. शिधा पत्रिका धारकांच्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी आमदार अग्रवाल यांनी अधिकारी वर्गाला यावेळी दिले.