मुंबई : राजधानी मुंबईतील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी आता दरवर्षी पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडील मंजुरी प्राप्त प्रस्तावानुसार, न्यायाधीशांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या पत्नी व परिवारातील सदस्यांना देखील या आदेशानुसार लाभ घेता येईल.
याप्रकरणी मुख्य सचिव व मुख्य न्यायाधीश यांच्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती. राज्य शासनाच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला होता. संयुक्त सचिव योगेश आमेटा यांच्या स्वाक्षरीने शासन आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशास चष्मा खरेदीसाठी दरवर्षी पन्नास हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे.