जळगाव : पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस या जिवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे म्हटले जात आहे. या मुद्द्यावर धरणगाव तालुका रा.कॉ. युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
धरणगाव तालुका रा. कॉ. च्या वतीने रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, तालुका कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे , विद्यार्थी उपाध्यक्ष वासुदेव सपकाळे, दिनेश पाटील, भुषण पाटील, अमर चव्हाण , प्रेमचंद चव्हाण, श्रीकांत साळुंखे तसेच बहुसंख्य पदाधिकारी हजर होते.