गोंदीया (अनमोल पटले) : शेतक-यांचे धान्य दिपावलीपुर्वी खरेदी करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आले आहे. शासनाकडून दिपावलीपुर्वी शेतक-यांचे धान्य खरेदी केले जाणार आहे. शासनाकडून तसा होकार मिळाला आहे.
यावेळी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 107 व आदिवासी विकास महामंडळाच्या 42 अशा 149 केंद्रावरुन धान्य खरेदीला सुरुवात केली जाणार आहे. येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणा-या खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांकडूनच केंद्रावर धान्य खरेदी केली जाईल.
या खरेदीकामी शासकीय सेवा सहकारी संस्थेच्या कर्मचा-यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे धान्य खरेदीची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. यावेळी धान्याचा हमीभाव प्रतिक्विंटल 1940 असा जाहीर करण्यात आला आहे. या किमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी केली जाणार नाही.