गोंदीया (अनमोल पटले) : गोंदीया जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग केंद्राची धान्य खरेदी सुरु होण्यापुर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी धान्य खरेदी सुरु होत असल्याची ओरड होत आहे. किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने याप्रकरणी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे.
30 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत खासगी धान्य खरेदी बंद करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून किसान युवा क्रांती संघटनेने केली आहे. गोंदीया जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांचे धान्य कमी प्रमाणात व कमी भावात घेतले जाते. खासगी व्यापारी त्याचा फायदा घेतात. खासगी धान्य खरेदी सुरु राहिल्यास किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे.