30 ऑक्टोबरपासून धान्य खरेदी

गोंदीया (अनमोल पटले) : शेतकर्‍यांची दिवाळी उत्साहात साजरी होण्यासाठी खा. प्र्फुल पटेल यांच्या पाठपुराव्याने दिवाळीपुर्वी 30 ऑक्टोबरपासून धान्य खरेदी सुरु होत आहे. खा. प्रफुल पटेल यांचा राज्य शासनाकडे सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. खा. पटेल यांनी दिवाळी पुर्वी धान्य खरेदी सुरु होणार असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता होत आहे.

30 ऑक्टोबरपासून शेतक-यांच्या धान्याची खरेदी सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोंदीया यांनी दिले आहेत. मार्केटींग फेडरेशनचे 107 आणि आदिवासी विकास महामंडळाचे 44 केंद्र सुरु होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

शेतकर्‍यांना हमीभाव, बोनस, नुकसान भरपाई मिळवून देण्याचे काम खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात शेतकर्‍यांचे थकलेले चुकारे आणि बोनस मिळवून देण्यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात जावी, या दृष्टीने खा.प्रफुल पटेल यांनी दिवाळीपूर्वी धान्यखरेदी केंद्र सुरु होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याशी पाठपुरावा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here