पाचोरा येथे आ. तांबे यांनी घेतली कॉंग्रेसची आढावा बैठक

On: October 30, 2021 8:27 AM

पाचोरा – आ. सुधीर तांबे यांनी पाचोरा येथे तालुका कॉंग्रेसची नुकतीच आढावा बैठक घेतली. तालुका अध्य्क्ष सचिन सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत कॉंग्रेसच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात आली.

आगामी काळात कॉंग्रेस पक्षाचे संघटन कसे करावे या प्रमुख विषयासह पदाधिका-यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. आ. तांबे यांच्या या भेटीने पाचोरा तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधे चैतन्य पसरले आहे. पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह यावेळी प. स. माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, राजेंद्र महाजन,प्रा. एस. डी. पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,शहर अध्यक्ष शरीफ शेख, महिला जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार,कल्पना निंबाळकर, प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शिवराम पाटील, प्रदीप पाटील, आदींची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment