चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस 9 पर्यंत कोठडी

जळगाव : रोख रकमेसह सोन्याचे दागीने असा 52 हजार रुपयांचा ऐवज बंद घराचे कुलूप तोडून चोरुन नेणा-या आरोपीस 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसीम कबीर पटेल (नशेमन कॉलनी मास्टर कॉलनी जळगाव) असे एमआयडीसी पोलिसांच्या अटकेतील सराईत आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेख सद्दाम अब्दुल वहाब (राम नगर मेहरुण जळगाव) हे 17 जुन 2021 रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश मिळवत एकुण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासात वसीम कबीर पटेल यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 9 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार वसीम याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत.

आरोपी वसीम पटेल यास सालार नगर येथील घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चौकशी केली असता त्यांने सदर गुन्ह्याची देखील कबुली दिली. त्याप्रमाणे त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. वसीम पटेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने व तो त्याच परिसरात चोरी करत असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय होता. त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर आधी पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, संजय धनगर, इम्रान सय्यद, किशोर पाटील, सचिन पाटील, हेमंत कळसकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान नंदुरबारकर सराफ या दुकानात चोरी करणा-या अटकेतील मोनुसिंग बावरी या आरोपीस स.पो.नि. प्रमोद पठारे यांनी न्यायालयात हजर केले. त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here