विराज कावडीया यांचे हटवले अनधिकृत बॅनर

जळगाव : जळगाव शहरातील अनधिकृत बॅनर, पोस्टर्स विरुद्ध माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी पुढाकार घेतला आहे. नेत्यांची विविध चौकातील, मुख्य रस्त्यावरील पोस्टर जाहिरातबाजी लहान मोठे अपघात घडण्यास कारणीभूत ठरत आहे. शहराचे विद्रुपीकरण देखील या माध्यमातून होत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पंधरा ते वीस फलक काल जळगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीनंतर काढण्यात आले. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आज जळगाव शहरातील पांडे चौकात विराज कावडीया यांच्या नियुक्तीचा भला मोठा फलक मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून लावण्यात आला होता. स्वतः च्या नियुक्तीचा फलक स्वतः विराज कावडीया यांनी लावल्याचे दीपक कुमार गुप्ता यांनी केलेल्या तपासा अंती आढळून आले. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा फलक हटवण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here