सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्राला सक्षम नेतृत्वाची गरज

गोंदिया (अनमोल पटले) : तिरोडा तालुक्यातील सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्र विकासापासुन शेकडो मैल दूर असल्याचे म्हटले जात आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी युवा नेतृत्वाची आवश्यकता असल्याची चर्चा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून सुरु झाली आहे. या क्षेत्रात राष्ट्रवादी, भाजप व कांग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर या तीन वेळा विजयी झाल्या आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारीचा ग्रीन सिग्नल दिल्यास राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापति डॉ. किशोर पारधी बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. रा.कॉ.च्या माध्यमातून या क्षेत्राचा गेल्या 15 वर्षांपासून विकास झाला नसल्याचे खुद्द कार्यकर्तेच खासगीत बोलू लागले आहेत.

सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्र यावेळी सर्व साधारण आहे. अशा वेळी युवा वर्गाला प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी जोर धरत आहे. रा.कॉ. पक्षाने महिला उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांना उमेदवारी देण्याऐवजी माजी उपसभापती डॉ. किशोर पारधी यांना उमेदवारी द्यावी असा सुर उमटत आहे. काँग्रेसचे ओम पटले व भाजपचे पवन पटले हे रिंगणात राहणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बदलले नाही तर बंडखोरी निश्चित समजली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here