गोंदिया जि.प., प.स. निवडणूका रद्द करण्याची मागणी

On: December 9, 2021 3:15 PM

गोंदीया (अनमोल पटले) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता गोंदीया जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन गोरेगावच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दहशत अजून संपलेली नाही. राज्य सरकार यावर वेळोवेळी उपाय काढत आहे. अशा वातावरणात गोंदीया जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यास कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे. या समस्येवरवर आळा घालण्यासाठी निवडणुका रद्द करण्याची मागणी वजा विनंती अखिल भारतीय बापू युवा संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन देतांना अखिल भारतीय बापू युवा संघटन गोरेगांव गोंदिया प्रमुख देवंद्र दमाहे, उप मीडिया प्रमुख (गोंदिया गोरेगाव) सुरेश साठवणे, मार्गदर्शक रंजीत वालदे, कमलेश मेश्राम, गोरेगांव शहर कार्यकर्ता दुर्गेश जगणे आणि समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment