गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जळगाव जिल्ह्यात आगमन

On: December 20, 2021 10:49 AM

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आज सकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जळगावच्या महापौर सौ.जयश्री महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. या प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, नाशिक विभागाचे आयजी बी.जी. शेखर पाटील उपस्थित होते. त्यानंतर पुढील कार्यक्रमांना उपस्थिती देण्यासाठी त्यांचे चोपडा शहराच्या दिशेने प्रयाण झाले.

त्यांचे पुढील कार्यक्रम — चोपडा येथे सकाळी 10.00 वाजता आगमन व चोपडा नगरपरिषद आयोजित सुवर्ण महाराष्ट्र जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत चोपडा शहरात नवीन पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ. दुपारी 12.00 ते 1.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा. दुपारी 1.00 ते 1.30 अरुणभाई गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या निवासस्थानी राखीव. 1:45 ते 2:15 वाजता चोपडा तालुका सहकारी सूतगिरणी जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपुजन.

दुपारी 2.15 वाजता चोपडा येथून जळगावकडे प्रयाण. 3.15 वाजता जळगाव येथे आगमन. 3:15 ते 4.00 पर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या नवीन निवासस्थान इमारतीचे उद्घाटन. 4.00 ते 5.00 पर्यंत नाशिक परिक्षेत्र अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्यासमवेत बैठक. 5.00 ते 6.30 पर्यंत अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. 6.30 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण व 6:45 वाजता आगमन. 7.00 वाजता खाजगी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment